Job Details

11th Admission Online Form 2025

Apply Now

School मधुन Collage मध्ये जाण्यासाठी सगळे 10th चे Student 11th Admission ची आतुरतेने वाट बघत असतात ती 11th Admission 2025 ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. १० वीचा निकाल लागतो, आणि त्यानंतर सुरु होतो एक नवा टप्पा – ११ वीचा ! ह्या टप्प्यावर येऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं मन अगदी उत्सुक, थोडं संभ्रमित असतं. “कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा?”, “कुठला ग्रुप निवडावा – सायन्स, कॉमर्स की आर्ट्स?” असे अनेक प्रश्न मनात घर करतात. ह्या वळणावर योग्य निर्णय घेणं फार महत्त्वाचं असतं. या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला 11th Admission 2025 साठी Educational Qualification कोणते लागणार, Fee किती आहे, Start Date व Last Date To Apply कोणती आहे या गोष्टींची थोडक्यात माहिती वर देण्यात आली आहे. आपल्याला जर वरील 11th Admission 2025 बद्दल Detailed माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Post ची Original Advertisement (मूळ जाहिरात) सुद्धा वाचू शकता आणि तसेच खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Online Application Form भरू शकतो.

11th Admission

11th Admission – Online Procedure 2025 – 2026 –

महाराष्ट्रातील इयत्ता ११ वी (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा) साठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने नुकताच यासंबंधी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला असून, या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या आर्टिकल मध्ये आपण संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत – पात्रता, फेऱ्या, कोटा, आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश असणार आहे.


प्रवेश कोणासाठी?

  • महाराष्ट्र बोर्ड, CBSE, ICSE, IGCSE व इतर मंडळांतून इ. १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

  • केवळ कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी ही प्रक्रिया आहे. व्यावसायिक शाखांकरिता प्रवेश ऑफलाईन असतील.


ऑनलाईन प्रवेश कसा होतो?

  1. प्रथम अर्ज नोंदणी (Part 1 & Part 2):

    • Part 1: वैयक्तिक माहिती

    • Part 2: गुण व पसंतीक्रम (कॉलेज निवड)

  2. प्रवेश फेऱ्या:

    • एकूण चार फेऱ्या व त्यानंतर “OPEN FOR ALL” फेरी.

    • पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये नाव लागल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

    • न घेतल्यास पुढील फेऱ्यांमधून विद्यार्थ्याचा अर्ज वगळला जातो.


गुण आणि प्राधान्य कसे ठरते?

  • इ. १० वीच्या सर्वोत्कृष्ट पाच विषयांचे सरासरी गुण विचारात घेतले जातात.

  • गुण समसमान असल्यास –

    1. जन्मतारीख (मोठा वयाचा विद्यार्थी)

    2. नावानुसार क्रम (Alphabetical)

    3. लॉटरी


विविध कोटा माहिती

कोटा प्रकार तपशील
अल्पसंख्याक कोटा ५०% (अल्पसंख्याक संस्था)
व्यवस्थापन कोटा ५% (फक्त खाजगी संस्था)
इन-हाऊस कोटा १०% (खाजगी संस्था)
आरक्षण कोटा शासनाच्या नियमानुसार

महत्वाच्या सूचना

  • खोटी माहिती / बनावट कागदपत्रे दिल्यास प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

  • OPEN FOR ALL फेरीत प्रवेश घेतल्यावर तो बदलता येत नाही.

  • प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज बदलायचा असल्यास पूर्वीचा प्रवेश रद्द करणे आवश्यक.


महत्वाच्या तारखा

(शासनाने वेळापत्रक लवकरच जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी https://mahafyjcadmissions.in/landing वेबसाइटवर नियमित भेट द्या.)


लागणारी कागदपत्रे

  • इ. १० वी मार्कशीट

  • जात प्रमाणपत्र (जर लागूं असेल तर)

  • अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र (गट A विद्यार्थ्यांसाठी)

  • पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (शैक्षणिक फी सवलतीसाठी)


11th Standard Admission Schedule – First CAP Round (2025)

Sr. No. Date & Time Admission Process Details
1 26 May 2025, 11:00 AM to 5 June 2025, 2:00 PM 1. Student registration and preference form filling begins. 2. Students can choose 1–10 Junior Colleges in preference list. 3. Admission allotment will be based on reservation and marks. 4. Students can also apply under Management, In-house, and Minority quota (Zero Round). 5. Consent is mandatory before each round. 6. Unallotted students can update preferences for next rounds.
2 5 June 2025 Provisional General Merit List published.
3 6–7 June 2025 1. Students can raise grievances via login. 2. Grievances will be resolved online by Dy. Director of Education. 3. Final decision will be made by the Dy. Director.
4 8 June 2025 1. Final General Merit List released. 2. Zero Round allotment for Management, In-house, and Minority quotas.
5 9–11 June 2025 Zero Round Admission: 1. Click “Proceed for Admission” if allotted. 2. Upload documents and visit allotted college for verification and fee payment.
6 9 June 2025 CAP Round Admission: 1. Allotment based on merit list. 2. Verified by division officials.
7 10 June 2025 1. Allotment list published. 2. Details available in student login. 3. Colleges receive allotment list. 4. Cutoff list published on portal.
8 11–18 June 2025 1. If satisfied, click “Proceed for Admission”. 2. Upload documents and visit college for verification. 3. If not satisfied, give consent for next round. 4. College to update admission status. 5. Students getting first preference must take admission or will be disqualified from Rounds 2–4. 6. To cancel admission, request college. 7. Cancelled students will be considered in later rounds.
9 20 June 2025 Vacant seat list for Round 2 (including quota). 

Notes – 

1. Students admitted under quota/CAP are considered admitted.

2. Fees accepted digitally only.

3. Follow schedule strictly.

4. Zero Round is from 9–11 June 2025.

Important Links – 11th Admission Form 2025 –

माहितीचा प्रकार लिंक

जाहिरात (Advertisement) (PDF)

11th Admission

Online Application (Apply Online)

Apply Online

For Login Application

Click Here

Main Website

Click Here

FAQ’s –11th Admission –

Question 1 – What documents are required during the admission process?

Answer – सर्वसाधारणपणे लागणारी कागदपत्रं:

  • दहावीची मार्कशीट (original + Xerox)

  • जात प्रमाणपत्र (जर लागूं असेल तर)

  • रहिवासी / अधिवास प्रमाणपत्र (विशेषतः गट A साठी)

  • पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (शैक्षणिक सवलतीसाठी)

  • ओळखपत्र (शाळेचे किंवा आधार कार्ड)

Question 2 – How is merit calculated for 11th admission?

Answer – दहावीच्या सर्वोत्कृष्ट पाच विषयांच्या सरासरी गुणांवरून मेरिट ठरते. जर दोन विद्यार्थ्यांचे गुण सारखे असतील तर पुढचे निकष वापरले जातात – वय, नावाचा क्रम आणि शेवटी लॉटरी.

Question 3 – Can I change my college after confirming admission?

Answer – हो, तुम्ही कॉलेज बदलू शकता पण त्यासाठी आधी घेतलेला प्रवेश रद्द करावा लागतो. मग तुम्ही नवीन फेरीमध्ये सहभागी होऊ शकता. पण हे करताना धोका असतो – नवीन कॉलेजमध्ये जागा मिळेलच याची खात्री नसते.

Question 4 – What if I don’t take admission in the college allotted in the first round?

Answer – जर तुमचं नाव पहिल्या फेरीत ज्या कॉलेजमध्ये लागलं असेल आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नाही, तर तुमचा अर्ज पुढच्या फेऱ्यांमधून काढून टाकला जाईल. म्हणजेच, तुम्ही उरलेल्या फेऱ्यांसाठी पात्र राहणार नाही. म्हणून पहिल्या पसंतीचा विचार नीट करा आणि प्रवेश घ्या.

You May Also Like – 

All Government Jobs

All Railway Jobs

All Bank Jobs

All Admission

All Admit Card

All Result

Home
Latest Jobs